हार्ट अ‍ॅटॅक, कॅन्सरला कंट्रोल करणाऱ्या औषधाचा शोध लागला!



अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानंतर संशोधकांनी दावा केला आहे की, एक नवे औषध विकसित करण्यात आले असून त्याच्या वापराने ‘हार्ट अ‍ॅटॅक आणि कॅन्सर’चा धोका कमी केला जाऊ शकतो. संशोधकांच्या मते, ‘कॅनेकईनुमेब’ असे या औषधाचे नाव असून त्याच्या वापराने वात व अन्य काही आजारही बरे होण्यास मदत मिळणार आहे. तसेच या औषधाने पुन्हा हार्टअ‍ॅटॅक येण्याची शक्यता 24 टक्यांनी कमी होते. ‘हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी’तील मुख्य संशोधक डॉ. पॉल रिडकर यांनी सांगितले की, या नव्या औषधाने उपचार जगतात नव्या युगाची सुरुवात होणार आहे.

👉 मोबाईल वापराने होऊ शकतो ब्रेन ट्यूमर?

‘एआईआईएमएस’ (एम्स)च्या वतीने करण्यात आलेल्या विश्‍लेषण व संशोधनात असे आढळून आले की, स्मार्टफोनच्या जास्त वापराने त्यातून बाहेर पडणार्‍या रेडिएशनमुळे ब्रेन ट्यूमरचा धोका वाढतो. या संशोधनानुसार दीर्घकाळ स्मार्टफोन वापरल्याने त्यातून बाहेर पडणार्‍या रेडिएशनमुळे ब्रेन ट्यूमरचा धोका 1.33 टक्क्यांनी वाढतो. सध्या जर 100 लोकांना ब्रेन ट्यूमर होत असेल तर मोबाईल रेडिएशनमुळे अशा रुग्णांची संख्या 133 वर पोहोचत आहे. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर न केलेलाच बरा. उपाययोजना म्हणून  स्मार्टफोनसाठी हेडफोन, हेडसेट अथवा कमी क्षमतेच्या ब्ल्यूटूथचा वापर करणे योग्य ठरेल.

👉 मानवाचा स्वभाव बदलला जाऊ शकतो?

मानवी स्वभावाला नियंत्रित करणार्‍या कोशिकांचा शोध लावण्यात अमेरिकन संशोधकांनी यश मिळविले आहे. या कोशिकेला ‘मास्टर कंट्रोलर’ असे नाव देण्यात आले आहे. मानवी स्भवावाला नियंत्रित करणारी ही कोशिका मेंदूत असते. मानवी मेंदूला थेट निर्देश देणार्‍या न्यूरॉन्सवर या कोशिकेचा प्रभाव असतो. या कोशिकेला ‘फास्ट स्पाईकिंग इंटरन्यूरॉन’ (एफएसआई) असेही म्हटले जाते. ‘मास्टर कंट्रोलर’ कोशिकेचे सक्रियतेमुळेच कोणत्याही माणसाचा स्वभाव निश्‍चित होतो. ‘ड्यूक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर’ च्या विशेषज्ज्ञांनी सांगितले की, औषधांच्या मदतीने या कोशिकेचा प्रभाव कमी करून मानवाचा स्वभाव बदलला जाऊ शकतो.

Comments

Popular posts from this blog

महत्वपूर्ण कागदपत्रे हरवल्यास; ‘हे’ करा

जाणून घ्या ऑफिस मॅनर्स आणि कल्चर...