जाणून घ्या ऑफिस मॅनर्स आणि कल्चर...


प्रत्येक ऑफिसचं कल्चर वेगवेगळे असते तरीही काही ऑफिस मॅनर्स, कामाच्या पद्धती आपण काटेकोरपणे पाळायला हव्यात. चला तर आज याबाबतीत सविस्तर जाणून घेवूयात...

👉 ऑफिस कल्चर म्हणजे काय?  : ऑफिसमध्ये काम करणार्‍या कामाची पद्धत, संस्थेचे एथिक्स, कर्मचार्‍यांमधील सुसंवाद, संस्थेची मुल्ये, ऑफिसची कामाची पद्धत आणि वातावरण म्हणजेच ऑफिस कल्चर. यामध्ये मग त्या ऑफिसने दिलेल्या सवलती, ऑफिस कसे आहे आणि इतर गोष्टींचा समावेश होतो.

👉 फॉलो ऑफिस कल्चर : सर्वात प्रथम ऑफिस कल्चरनुसारच वागण्याचा प्रयत्न करा. जसे एखाद्या ऑफिसमध्ये नावाने संबोधण्याची पद्धत नसेल तर योग्य ठिकाणी सर किंवा मॅडम असे संबोधन वापरा.

👉 ऑफिस नियम तोडू नका : आपल्या कामाची जबाबदारी समजून घेऊन ती योग्यप्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी आवडत नसतील तरीही ऑफिसचे नियम तोडण्याचा प्रयत्न करू नका, तर त्यानुसार काम करण्याची तयारी ठेवा. प्रसंगानुरूप पडणारे एखादे काम तुमच्यासाठी गैरसोयीचे किंवा न आवडणारे असेल तरीही ते करण्याची तयारी हवी.

ऑफिस कल्चरमधून काही मूल्ये, नियम, बंधनं घातली जातात. त्यामुळे तिथे काम करणार्‍या व्यक्तींनी पाळणं बंधनकारक असतं. ऑफिसमधील खेळीमेळीचे वातावरण तुम्हाला अजून काम करण्यासाठी किंवा क्वालिटी वर्क देण्यासाठी गरजेचे असते. असं असलं तरी जॉब हे आपलं प्रोफेशन आहे. हे लक्षात ठेवून तुम्ही प्रोफेशनल व्हायलाच हवे, हो की नाही?

👉 प्रोफेशनल होण्यासाठी खालील गोष्टी गरजेच्या…

1) तुमच्या सहकार्‍याशी संबंध कसेही असोत; पण सगळ्यांशी हसून खेळून वागा.

2) तुमचे डेली रिपोर्टस किंवा मंथली रिपोर्ट व्यवस्थितपणे आणि वेळेत देत जा.

3) ऑफिसमध्ये खरं आणि स्पष्ट बोला. खरं बोलतानाही समोरच्याचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्या.

4) कामात जर तुमच्याकडून काही चूक झाली तरी स्वत:ची चूक मान्य करा.

5) काम करताना तुमचे व्यक्तिगत रागद्वेष दूर ठेवा.

6) ऑफिसमध्ये खेळकर वातावरण राखणे सर्वांचीच जबाबदारी असते, याचे भान असू द्या.

7) ऑफिस गॉसिप्स करू नका आणि त्यात भाग घेऊ नका.

8) ऑफिसमधील राजकारणापासून दुर रहा. आपले काम काटेकोर आणि चोखपणे पार पाडा.

9) सहकार्‍यांशी बोलताना शक्यतो एकमेकांना कळेल एवढ्याच आवाजात बोला. फोनवर किंवा मोबाईलवर बोलताना तुमच्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या.

10) मेल्स, डॉक्युमेंट्स, फॅक्स, टेलिफोन्स आणि इतर बाबी ऑफिशियल मॅटरसाठी वापरा. वैयक्तिक कामासाठी नाही.

11) ऑफिसमध्ये कामाविषयी चर्चा करायची असल्यास त्या व्यक्तीशी किंवा मॅनेजमेंटशी व्यक्तीश: जाऊन भेटा आणि बोला.

12) ऑफिसमध्ये कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर इत्यादी मशिन्स नीट आणि काळजीपूर्वक हाताळा.

13) तुम्हाला दिलेले काम वेळेत पूर्ण करा. विलंब होत असल्यास त्याची पूर्वसूचना संबंधित अधिकार्‍याला / वरिष्ठाला द्या.

14) खाद्यपदार्थ ऑफिसमध्ये आणणं शक्यतो टाळा आणि ऑफिसचा परिसर स्वच्छ ठेवा.

वरील प्रकारे वर्क एथिक्स पाळल्यास तुमचे ऑफिसमध्ये काम करणे हे आनंदायी आणि उत्साहवर्धक होते. शिवाय तुम्ही प्रोफेशनल बनता, जे तुमच्या उज्वल भविष्यासाठी महत्वाचे आहे.

Comments

Popular posts from this blog

स्त्री रक्षणासाठी काही सेफ्टी अॅप्स

महत्वपूर्ण कागदपत्रे हरवल्यास; ‘हे’ करा