स्त्री रक्षणासाठी काही सेफ्टी अॅप्स


स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. रोज कुठे ना कुठे अत्याचाराच्या घटना विषयी वाचतो किंवा ऐकतो. त्यामुळे स्त्रियांची सुरक्षा ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. अत्याचाराच्या घटना आपण पूर्णपणे थांबवू शकत नसलो तरी स्मार्टफोनच्या साहाय्याने अशा घटनांना आळा घालू शकतो. कारण आज बहुतेक स्रिया स्मार्टफोनचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे स्त्री सरंक्षणाच्या दृष्टीने काही सेफ्टी अॅप्स तयार केले आहेत. याच्या वापराने पीडित महिलेला तातडीने मदत मिळू शकते व गुन्हेगार पकडला जाऊ शकतो.

👉 Life 360 App

तुम्ही ज्या लोकेशनवर आहात त्या लोकेशनची माहिती तुमच्या घरच्यांना हे अॅप पाठवते. या अॅपद्वारा जीपीएस, वाय-फाय किंवा कॉल ट्रायंग्यूलेशनच्या माध्यमातून कोणता व्यक्ती कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती मिळवता येते. या व्यतिरिक्त या अॅप मध्ये एक पॅनिक बटन देखील देण्यात आले आहे. जे दाबल्यावर जवळच्या व्यक्तीला मदतीसाठी sos मेसेज पाठवला जातो.

👉 Nirbhaya: Be Fearless


दिल्लीमधील दुर्दैवी निर्भया प्रकरणानंतर हे अॅप तयार करण्यात आलं आहे. यामध्ये जीओ फॅन्स, स्टॉप, शेक टू अलर्ट, अनसेफ एरिया अलर्ट आणि हीट मॅप सारखे जबरदस्त फीचर्स आहेत. या व्यतिरिक्त हे अॅप प्रत्येक 300 मीटरनंतर लोकेशन अपडेट करते. संकटाच्या वेळी जर या अॅप मधला sos पर्याय तुम्ही निवडला तर दर 2 मिनिटांनी हे अॅप तुम्ही ज्या व्यक्तींचे नंबर सेव्ह केले आहेत त्यांना मेसेज पाठवत राहील.

👉 I Feel Safe

या अॅप मध्ये व्हर्चूअल पॅनिक बटनची खास सोय देण्यात आली आहे. अॅप मधील सेफ्टी पावर बटन पाच वेळा दाबल्यावर अलार्म अॅक्टीव्ह केला जाऊ शकतो. जेव्हा तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन लॉक असेल किंवा सीम कार्डला नेटवर्क नसेल तेव्हा देखील हे अॅप काम करते. मुख्य म्हणजे या अॅपमधील बहुतांश फीचर्ससाठी इंटरनेटची देखील गरज नाही.

👉 ICE: Personal Safety App


या अॅपच वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही स्मार्टफोन एकदा झटकला किंवा स्मार्टफोनला कनेक्ट असलेला एयरफोन ओढून काढला तर हे अॅप तुमच्या कॉन्टॅक्सना लगेच अलर्ट पाठवते. जीपीएस लोकेशन सोबत इमेल आणि टेक्स्ट मेसेज देखील तुमच्या कॉन्टॅक्सना पाठवला जातो. सोबतच हे अॅप तुम्हाला आसपासची पोलीस स्टेशन्स आणि हॉस्पिटलची देखील माहिती देते. या व्यतिरिक्त हे अॅप महिलांना सेल्फ डिफेन्सच्या टिप्स देखील पाठवत असते.

👉 Chilla - Anti Rape Women App

हे अॅप ओरडण्याचा किंवा किंचाळण्याचा आवाज ऐकल्यावर काहीतरी धोका आहे हे लगेच ओळखते आणि ऑटोमॅटिकपणे अॅक्टीव्ह होते. इतर अॅप्स प्रमाणे हे अॅप देखील संकटकाळी तुमच्या कॉन्टॅक्सना तुमचे लोकेशन पाठवते. स्मार्टफोनचे पावर बटन 5 वेळा दाबल्यावर देखील हे अॅप अॅक्टीव्ह करता येते. मुख्य म्हणजे फोन स्वीच ऑफ असेल किंवा बॅटरी संपली असेल तरी हे अॅप काम करते.

Comments

Popular posts from this blog

महत्वपूर्ण कागदपत्रे हरवल्यास; ‘हे’ करा

हार्ट अ‍ॅटॅक, कॅन्सरला कंट्रोल करणाऱ्या औषधाचा शोध लागला!

जाणून घ्या ऑफिस मॅनर्स आणि कल्चर...