जाणून घ्या ऑफिस मॅनर्स आणि कल्चर...
प्रत्येक ऑफिसचं कल्चर वेगवेगळे असते तरीही काही ऑफिस मॅनर्स, कामाच्या पद्धती आपण काटेकोरपणे पाळायला हव्यात. चला तर आज याबाबतीत सविस्तर जाणून घेवूयात... 👉 ऑफिस कल्चर म्हणजे काय? : ऑफिसमध्ये काम करणार्या कामाची पद्धत, संस्थेचे एथिक्स, कर्मचार्यांमधील सुसंवाद, संस्थेची मुल्ये, ऑफिसची कामाची पद्धत आणि वातावरण म्हणजेच ऑफिस कल्चर. यामध्ये मग त्या ऑफिसने दिलेल्या सवलती, ऑफिस कसे आहे आणि इतर गोष्टींचा समावेश होतो. 👉 फॉलो ऑफिस कल्चर : सर्वात प्रथम ऑफिस कल्चरनुसारच वागण्याचा प्रयत्न करा. जसे एखाद्या ऑफिसमध्ये नावाने संबोधण्याची पद्धत नसेल तर योग्य ठिकाणी सर किंवा मॅडम असे संबोधन वापरा. 👉 ऑफिस नियम तोडू नका : आपल्या कामाची जबाबदारी समजून घेऊन ती योग्यप्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी आवडत नसतील तरीही ऑफिसचे नियम तोडण्याचा प्रयत्न करू नका, तर त्यानुसार काम करण्याची तयारी ठेवा. प्रसंगानुरूप पडणारे एखादे काम तुमच्यासाठी गैरसोयीचे किंवा न आवडणारे असेल तरीही ते करण्याची तयारी हवी. ऑफिस कल्चरमधून काही मूल्ये, नियम, बंधनं घातली जातात. त्यामुळे तिथे काम करणार्या व्यक...